उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडव.
कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे.कितीतरी लहान-मोठ्या नद्या तिला येवून मिळतात.गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.
नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती.ते कृष्णेचे दुसरे दर्शन.एका बाजूला उंच दरड आणि दुसर्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विसरणार व त्यात होणारी वांगी , काकड्या, कलिंगडे,टरबुजे यांचे अमृतमळे.कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली,की त्याला वारंवार खावीशी वाटतील.सतत एक-दोन महिने ती सारखी खात राहिलो, तरीही तृप्ती होणार नाही; मग वीट येणे दूरच राहिले.
(१) 'महाराष्ट्माता' कोणत्या नदीला म्हणतात ?
१) कृष्णा
२) वेण्णा
३) कोयना
४) गोदावरी
(२) कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात ?
(अ) काकड्या
(ब) टरबुजे
(क) कलिंगडे
(ड) वांगी
१) (अ), (ब),(क) आणि (ड)
२) फक्त (अ) आणि (ब)
३) फक्त (ब) आणि (क)
४) फक्त (अ)
(३) पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही?
१) मन न भरणे
२) पूर्ण करणे
३) कंटाळा येणे
४) चव घेणे
0 Comments