Latest Update

6/recent/ticker-posts

मराठी कविता व त्यावर आधारित प्रश्न भाग 2 text

पुढील कविता वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडव.


माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार ,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या  अभंगाला
मंद चिपळ्याची साथ ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडुपात 
पिऊनिया रानवारा खोंड नावे वारेमाप ,
येता मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातीत,
उभारलेल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत
धारा वर्षतां वरून
बैल वशिंड हालवी ,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

पुढील प्रश्न वाच व योग्य पर्याय निवडा...

(१) खोंड सैरावैरा का धावत होता ?
१) मातीचा सुगंध आल्यामुळे
२) रानवारा अंगाला लागल्याने
३) टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे
४) कळपातून चुकल्यामुळे

(२) कवितेतील वर्णनानुसार ' भुकेलेले तान्हे बाळ ' कोणाला म्हटले आहे ?
१) शिवार
२) पक्षी
३) खोंड
४) वासरू

(३) कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे ?
१) शरद
२) हेमंत
३) शिशिर
४) वर्षा

Post a Comment

0 Comments