Latest Update

6/recent/ticker-posts

नफा-तोटा संबंधित सर्व संकल्पना स्पष्ट करणे व नमूना उदाहरणे text

नफा -  तोटा 
(१) माल ज्या किंमतीला घेतात ,त्या किमतीला खरेदी किंवा खरेदीची किंमत असे म्हणतात.
(२) माल ज्या किंमतीला विकतात ,त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात.
(३) खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो.
(४) खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो .
(५) खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च ....  उदा., वाहतूक खर्च ,हमाली , कर ,दुरूस्तीसाठी केलेला खर्च यांचाही विचार करावा लागतो .
(६) ऐकून खरेदी = मूळ खरेदी + इतर खर्च .
(७) नफा व तोट्याचे सूत्र :a) नफा = विक्री-खरेदी
b) तोटा =खरेदी - विक्री
c) i) खरेदी = विक्री - नफा
ii) खरेदी = विक्री + तोटा
d) i) विक्री = खरेदी + नफा
ii) विक्री = खरेदी - तोटा

शिष्यवृत्ती परीक्षा - गणित संबंधित सर्व घटकनिहाय pdf, video, Online Test साठी येथे टच करा.


नमुना प्रश्न

(१) ४९६३ रुपयांस खरेदी केलेल्या वस्तू ५३५४ रूपयांस शिकवल्या , तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल ?
१) ₹ ३९१ तोटा होईल
२) ₹ ४०९ नफा होईल
३) ₹ ३९१ नफा होईल
४) ₹ ४९१ तोटा होईल
  स्पष्टीकरण : येथे विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे . म्हणून, या व्यवहारात नफा होईल.
नफा = विक्री - खरेदी  
₹ ५३५४ - ₹४९६३ = ₹३९१
पर्याय (३) हे अचूक उत्तर आहे.

(२) सलीमने ₹ २५ प्रकरणी डझन या दराने ३ डझन पेन्सिली खरेदी केल्या व त्या प्रत्येकी ₹ ३ प्रेमाने शिकवल्या ,तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला ?
१) ₹ ३३
२) ₹ ११
३) ₹ ३६
४) ₹ ४५
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = ₹ २५ × ३ ₹ ७५
विक्री किंमत = (३ × १२ )× ३ = ₹ १०८  (१ डझन = १२ पेन्सिली
३ डझन = ३× १२ = ३६ पेन्सिली)
नफा = ₹ १०८ - ₹ ७५ = ₹ ३३
पर्याय (१) हे अचूक उत्तर आहे .
(हे उत्तर आपण १ डझन पेन्सिलींच्या विक्रीतून मिळणारा नफा आधी काढूनही मिळवू शकतो.)

Post a Comment

0 Comments