Latest Update

6/recent/ticker-posts

कुटप्रश्न - रांगेतील स्थान संकल्पना स्पष्ट करणे व प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स text

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या घटकात समानार्थी शब्द या घटकाला अत्यंत महत्व आहे. या समानार्थी शब्दावर आधारित प्रश्न बुद्धिमत्ता या विषयात सुद्धा विचारले जातात. त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात आला आहे.



दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणमध्ये समानार्थी शब्द असे म्हणतात.

कूटप्रश्न
संकल्पना :
   काही वेळा एखादी समस्या फार गुंतागुंतीची आहे, असे आपल्याला जाणवते. दैनंदिन व्यवहारातील साधी सरळ माहिती समजून घेणे , तिची उकल करणे आपल्याला कठीण जात नाही . पण माहीती गुंतागुंतीची असेल तर,तिची उकल करताना आपण गोंधळतो .अशा माहितीवर तर्क - विचार करून टप्प्याटप्प्याने तिची उकल करणे गरजेचे असते . या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या बुद्धीस कस लागतो , असे म्हणता येईल .
    थोडक्यात , कूटप्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न . 
यांमध्ये 
(१) रांगेतील स्थान
(२) दिशा
(३) दिनदर्शिका
(४) वेतन आकृती
(५) कोडे  ( चौरस, त्रिकोण,वर्तुळ इत्यादी आकृत्यांतील संख्या ) या पाच उपघटकांचा समावेश असतो.

कुटप्रश्न - रांगेतील स्थान

ओळख : 
या उपघटकामध्ये दोन प्रकारच्या रांगांवर प्रश्न विचारले जातात. पहिला प्रकार - एका आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तींची रांग ( उदा.,एकमेकांचे हात धरून उभे असणाऱ्या व्यक्ती )
 दुसरा प्रकार - एकामागोमाग उभे राहणाऱ्या व्यक्ततींची रांग ( रेल्वे तिकिटासाठी उभे असणाऱ्या व्यक्ती ). 

रांगेविषयक प्रश्नात रांगेतल्या एका टोकाकडून किंवा दोन्ही टोकाकडून व्यक्तीचे स्थान क्रमांक दिलेले असतात. या माहिती वरुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांने काढायचे असते .

उपयुक्त टिपा : 
(१) रांगेतील व्यक्तीचे स्थान दोन्ही बाजूकडून दिलेले असते ,तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही ,याची दक्षता घ्यावी .
(२) रांगेतील एका व्यक्तीचे स्थान एका बाजूकडून दिलेले असते आणि रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या दिलेली असते , तेव्हा त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत मोजावे.
(३) रांगेतील व्यक्ती मोजताना एखादी व्यक्ती दोन वेळेस मोजली जाणार नाही याची काळजी घ्या.

अतिशय महत्त्वाचे

 



Post a Comment

0 Comments