Latest Update

6/recent/ticker-posts

NTS Exam परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा.

NTS Exam 2020 ही परीक्षा 13 डिसेंबर रोजी होत आहे. या परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. या सूचना अवश्य लक्षात ठेवा म्हणजे काही अडचण निर्माण होणार नाही. धावपळ उडणार नाही. 

परीक्षार्थ्यासाठी सूचना
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सोबत आणावे व निकाल घोषित होईपर्यंत जतन करुन ठेवावे. 

विद्यार्थ्याने परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी विद्यार्थ्याने आपल्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत करावी.

सर्व लेखन साहित्य व पिण्याच्या पाण्याची बाटली विद्यार्थ्याने सोबत आणावी.

परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, लॉंगटेबल, रेडी रेकनर इ. साहित्य आणून नये.

अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय/Non-Creamy layer/EWS/दिव्यांग असलेबाबत सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा करणे बंधनकारक आहे.

परीक्षा हॉल सोडण्यापूर्वी आपली उत्तरपत्रिका संबंधित पर्यवेक्षकाकडे जमा करावी व कार्बनलेस पर्यंत निकाल घोषित होईपर्यंत स्वत:कडे जपून ठेवावी.

उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नांचे उत्तर नोंदविताना काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा. शक्यतो काळा बॉलपेन वापरा. उत्तरपत्रिका स्कॅन करताना काळा रंग चांगला स्कॅन होतो. चुकीच्या पद्धतीने नोंदविलेल्या उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत.

४०% पेक्षा जास्त दृष्टीदोष असल्यास विद्यार्थ्याने त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र केंद्र संचालकास सादर करावे. केंद्र संचालकांची खात्री पटल्यानंतरच त्यास ज्यादा वेळची सवलत दिली जाईल. 

COVID -19 ज्ञा रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने विहित केलेल्या निर्देशानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. उदा - शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे, स्वत:सोबत सॅनिटायझर बॉटल बाळगणे व आवश्यकतेनुसार वापर करणे.

सोबत जोडलेले COVID-19 बाबतचे स्वयंघोषणापत्र ( self declaration ) भरुन परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा करणे बंधनकारक आहे.

COVID-19 स्वयंघोषणापत्रात स्वत:ला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर कोणतेही कोविड विषाणूशी संबंधित लक्षणे नसलेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. हे प्रमाणपत्र परीक्षेच्या दिवशी सादर करताना त्या दिवशीचाच ताप Temperature त्यामध्ये नोंदवणे आवश्यक आहे. 




Post a Comment

0 Comments