Latest Update

6/recent/ticker-posts

नवोदय परीक्षा सर्वसाधारण माहिती

  ▪️ *5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते*

• प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते 
• ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 
• SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे. 
• निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* .

▪️ *परीक्षा*
• परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते. 

• एकूण गुण - 100 
• एकूण प्रश्न संख्या - 80 
• प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी.
• परीक्षा वेळ - 2 तास.

▪️ *विषय व गुण*
• मानसिक क्षमता - 40 प्रश्न 
" 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. " 
• अंकगणित  - 20 प्रश्न 
" एकूण 15 घटक आहेत . काठिण्यपातळीत थोडी वाढ करण्यात आली आहे. "
• मराठी / प्रथम भाषा. - 20 प्रश्न 
" एकूण 4 उतारे असतात. प्रत्येक उतारावरील 5 प्रश्न विचारली जातात. "

▪️ *अभ्यास कसा करावा* 
1) *मानसिक क्षमता चाचणी*
    संपूर्ण 40 प्रश्न आकृत्या वरील आधारीत असून जास्तीतजास्त सराव करणे गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळवता येतात. 

2) *अंकगणित* 
" 15 ते 16 घटक असून गणितात पैकी च्या पैकी गुण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे "
2019 व 2020 चे झालेले पेपर्स पहा. 
काठिण्य पातळी लक्षात घेऊन तशा प्रश्न चा सराव करून घ्यावे .
Coastal Mind App मध्ये सरावासाठी अनेक प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकता.

3) *भाषा*
" एकूण 4 उतारे असून या साठी आपणास जास्तीत जास्त वाचन ...उतारे...लेख...नविनविन बालसाहित्य लेख. वाचन करणे आवश्यक आहे ". 
विद्यार्थ्यांचे समानार्थी शब्द / विरूद्धार्थी शब्द व शब्द संपत्ती चांगली असेल तर 20 पैकी 20 गुण सहज मिळवता येतात. 
Coastal Mind App मध्ये सरावासाठी 200 पेक्षा जास्त उतारे आहेत  ते आपण सोडवू शकता

▪️ *किती गुण आवश्यक आहेत निवड होण्यासाठी*
- बुद्धिमत्ता 40 प्रश्न बरोबर यावे 
- मराठीत 20 प्रश्न यावे.
- गणित 18 प्रश्न बरोबर ...

म्हणजे आपली निवड निश्चित समजा. 

80 प्रश्न पैकी किमाण 76 प्रश्न बरोबर आले तरच निवड निश्चित.

Post a Comment

0 Comments