शब्दांच्या जाती
शब्दांच्या आठ जाती असतात. पुर्वप्राथमिक शिष्यवृत्तीसाठी चार च जाती अभ्यासल्या जातात.
*नाम* - एखाद्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी .... यांच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
*उदा - तानाजी, लाडू, दगड, भारत, हिमालय, सृष्टी....*
*सर्वनाम*- नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
*उदा- हा,ही,हे, तो,ती,ते, मी, आपण, तु, तुम्ही, आम्ही, कोण, कोणाला....*
*विशेषण*- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदा-
*हुशार* राजू
*गरम* चपाती
*हिरवीगार* पाने
*उंच* मुलगा
*तीन* फुले
*क्रियापद* - वाक्याची क्रिया ज्या शब्दाने पुर्ण होते त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा-
समीर दररोज पुस्तक *वाचतो.*
मला आंबा खूप *आवडतो.*
वाघ जंगलातील गुहेत *राहतो.*
0 Comments