Latest Update

6/recent/ticker-posts

लिंग

*लिंग कसे ओळखावे...*

अधोरेखित शब्दाला *तो, ती, ते* असे विचारल्यास उत्तर मिळते.

तो म्हणजे पुल्लिंग
ती म्हणजे स्रीलिंग
ते म्हणजे नपुसकलिंग

वही - स्रीलिंग.   *ती वही*
पुस्तक - नपुसकलिंग. *ते पुस्तक*
पेन - पुल्लिंग. *तो पेन*

लिंग निश्चित करताना पुढील दोन बाबी लक्षात ठेवा.

1) ज्या शब्दाचे लिंग विचारले आहे तो शब्द जर अनेकवचनी असेल तर त्याचे अगोदर एकवचन करुन नंतरच तो, ती, ते वापरुन लिंग निश्चित करावे.
*उदा- पुस्तके याचे ~स्रीलिंग~  न लिहिता एकवचन पुस्तक असे करुन लिंग *_नपुसकलिंग_* निश्चित करावे*

2) अधोरेखित शब्द आदरयुक्त असतील तर तात्पुरता आदर काढून लिंग निश्चित करावे.

उदा - बाबांनी मला खावू आणला.
यामध्ये ते बाबा असे म्हटले तर ~नपुसकलिंग~ येते परंतू बाबा या शब्दाचे लिंग *पुल्लिंग* येते. *यामध्ये तात्पुरता आदर काढून ते बाबा ऐवजी तो बाबा असे म्हणावे*

Post a Comment

0 Comments