*प्रश्न १ - दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे....*
३, ४, ८, १ या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे...
*चार अंकी* - सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. नंतर राहिलेले अंक चढत्या क्रमाने घेणे..
*उत्तर - १३४८*
*पाच अंकी* - चार अंक दिलेले असतील अन् पाच अंकी लहानात लहान संख्या विचारल्यास सर्वात लहान अंक दोनदा घ्यावा.
*उत्तर - ११३४८*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*प्रश्न २ - दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे....( अंकामध्ये ० असताना )*
९, ०, ८, ६ या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे...
*चार अंकी* - सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. जर शून्य सुरुवातीला घेतला तर तीन अंकी संख्या होते. त्यामुळे चार अंकी संख्या बनविण्यासाठी शून्य सोडून दुसरा लहान अंक घ्यावा. नंतर शून्य घ्यावे व नंतर पुढील अंक चढत्या क्रमाणे घ्यावेत..
*उत्तर - ६०८९*
*पाच अंकी* - सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. जर शून्य सुरुवातीला घेतला तर तीन अंकी संख्या होते. त्यामुळे चार अंकी संख्या बनविण्यासाठी शून्य सोडून दुसरा लहान अंक घ्यावा. नंतर शून्य घ्यावे व नंतर पुढील अंक चढत्या क्रमाणे घ्यावेत. *पाच अंकी संख्या बनविण्यासाठी लहान अंक दोनदा घ्यावा.*
*उत्तर - ६००८९*
उदा )
5, 0, 8, 4 या अंकापासून लहानात लहान संख्या बनवा ?
चार अंकी - 4058
पाच अंकी - 40058
सहा अंकी - 400058
सात अंकी - 4000058
0 Comments